गजानन नाईक; पत्रकार संघ व अर्चना फांउडेशनच्या वतीने “त्या” युवकांचा सन्मान
सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपत्कालीन परिस्थितीत अडचणीत असलेल्यांना तात्काळ सहकार्य करणे सोईचे व्हावे यासाठी आपत्ती निर्माण होणार्या गावात किमान वीस युवकांचे पथक तयार करुन त्यांना शासनाकडुन आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी आम्ही जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून शासनाकडे करणार आहोत, असे मत अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन नाईक यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान आपल्या जीवावर उदार होवून पर्यटकांचे प्राण वाचविणार्या युवकांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. मात्र सावंतवाडी पत्रकार संघ आणि अर्चना घारे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारुन त्यांचा उचित सन्मान करण्यात आला. हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावंतवाडी पत्रकार संघ आणि अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून सरमळे येथे पुरात अडकलेल्या पर्यटकांना वाचविणार्या संजय सावंत, विश्वजीत गावडे, संजय गावडे, रजत देसाई, अक्षय तळवडेकर (सर्व सरमळे), एकनाथ दळवी (विलवडे), संजय गावकर (ओटवणे) या युवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, डिजीटल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपंकर गावडे सचिव मयुर चराठकर, रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. नाईक म्हणाले, या ठिकाणी अडचणीच्या काळात मदत करणार्या युवकांचा योग्य तो सन्मान करणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने शासनाकडुन तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे पत्रकार संघाने घेतलेला पुढाकार निश्चितच त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा देणारा ठरेल. यावेळी सौ. घारे यांनी त्या सातही युवकांना शुभेच्छा दिल्या. आपल्या जीवावर बेतून मदतकार्य करणार्या युवकांच्या धाडसीपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अशा प्रकारचा अनोखा उपक्रम राबवून धाडसी युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची संधी आपल्याला मिळतेे हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. पवार व अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. या प्रसंगी उपसरपंच दिपंकर गावडे, मयुर चराठकर, रामचंद्र कुडाळकर, दीपक गांवकर, नरेंद्र देशपांडे, लुमा जाधव, विनायक गांवस, शैलेश मयेकर, आनंद धोंड, साबाजी परब, मंगल कामत, सचिन रेडकर, मोहन जाधव, रामदास पारकर, भुवन नाईक, रूपेश हिराप, राजू तावडे, निलेश परब, अर्चना फाउंडेशनचे वैभव परब, आकार पांढरे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार लुमा जाधव यांनी मानले.