पालकांनी शिक्षकांप्रमाणे आपल्या पाल्याच्या दैनंदिन अभ्यासाकडे लक्ष द्यावे- संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे पालकांना आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने आज अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या पालक व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षण संस्था यांच्यात समन्वय असावा संस्थेची ध्येय धोरणे पालकांना समजावी या उद्देशाने आज प्रशालेमध्ये पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल पासून परावृत्त करण्यासाठी व अभ्यासाचे गांभीर्य लक्षात यावं या उद्देशाने शालेय स्तरावर दर महिन्याला शिकवलेल्या अध्यापन घटकांवर सराव चाचणी घेतली गेली होती त्या पहिल्या सराव चाचणी च्या निकालाचे वाचन करण्यात आले. या पालक सभेस उपस्थित गरीब, होतकरू व इतर अशा २०० विद्यार्थ्यांसाठी संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सभेस उपस्थित पालक वर्गाकडून शालेय उपक्रमांचे कौतुक करण्यात आले शिवाय काही सुचना देखील करण्यात आल्या. पालकांनी आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी दिवसातील थोडा वेळ द्यावा. शाळेतील अभ्यास, उपक्रम याबाबत त्यांच्याशी संवाद साधावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले. यावेळी प्रशालेच्या माता पालक संघ व शिक्षक पालक संघासाठी उपस्थित पालक वर्गामधून इयतावार १०-१० पालकांची निवड करण्यात आली. या प्रसंगी संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक पाटील पी.एम, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील, जेष्ठ शिक्षक एस.बी.शिंदे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सावंत पी.जे., तसेच सर्व माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक – विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.