100 टक्के वसूली,संचालक मंडळ आणि सर्व सभासदाचा हा सन्मान- देवेंद्र हडकर,चेअरमन
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदर या सोसायटीला ओरोस येथील शरद भवन येथे आयोजित जिल्हा बँकेच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम शेअर्स देवून गौरवीण्यात आले. 2022-23 या आर्थिक वर्षात संस्थेने 100% वसूली केल्या बद्दल हा गौरव करण्यात आला.
हा गौरव म्हणजे सोसायटी संचालक मंडळ व सर्व सभासदांचा गौरव असून यापुढे सोसायटीला प्रगती पथावर नेण्याचा व उलाढाल वाढवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चेअरमन देवेंद्र हडकर म्हणाले.
यावेळी सोसायटी सचिव कविंद्र माळगांवकर, संचालक विवेक परब तसेच जिल्ह्यात बहुसंख्य सोसायटींचे संचालक चेअरमन उपस्थित होते.











