उत्कृष्ट कामगिरीबद्दल केला गौरव
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्यामहसूल दिनानिमित्त गुणगौरव करण्यात येतो. आज १ ऑगस्ट रोजी महसूल दिनाला प्रारंभ झाला असून पुढील दिवस “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. आज सर्वत्र राज्यात महसूल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महसूल विभागामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करून महसूल विभाग चा नावलौकिक वाढवण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या अशा अधिकाऱ्यांना गौरवण्यात येते.सिंधुदुर्गनगरी येथे महसूल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी तहसीलदार यांचा गुणगौरव करून शासन आपल्या दारी उपक्रम, फर्स्ट कम फर्स्ट आऊट प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी, तसेच आपत्तीमध्ये तात्काळ मदत असे कार्यपद्धती राबवल्याबद्दल सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील केलेल्या कामाचेदखल जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रशासन ने घेतली आहे.