खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे माजी सरपंच व सामजिक कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत यांनी नुकतीच कणकवली तालुक्याचे नवीन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची कणकवली तहसील कार्यालय येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच कणकवली तालुक्याचे खारेपाटण हे गाव टोकाचे असून या गावातील नागरिकांच्या आसणाऱ्या विविध समस्या जाणून घेऊन महसूल विभागा अंतर्गत येणाऱ्या प्रशासकिय अडचणी दूर कराव्यात अशी मागणी देखील खारेपाटण माजी सरपंच श्री राऊत यांनी यावेळी केली. तर नवनियुक्त रुजू झालेले कणकवली तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांचे स्वागत करत खारेपाटण गावच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.