वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

संस्था पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांसह आदर्श शिक्षक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना करण्यात आले सन्मानित

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोहळा शुक्रवार दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी प्रशालेच्या पटांगणावर संपन्न झाला. भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून, संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व सरस्वती पूजन करून स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर दहावी – बारावी बोर्ड परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना, स्नेहसंमेलन निमित्ताने आयोजित वेशभुषा स्पर्धा, वर्ग सजावट स्पर्धा यांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व प्रशंसनीय जनसेवा केल्याबद्दल कलाशिक्षक मंदार चोरगे, प्रकाश पाटील, विजय मरळकर, शिक्षिका संगिता पाटील उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्याबद्दल लिपिक प्रतिभा कोकरे यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी बद्दल शिक्षक संदिप शिंदे, सायली सबनिस, योगेंद्र चव्हाण, यांना देखील सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने गौरविण्यात आले. संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद रावराणे, सचिव अर्जुन रावराणे,विक्रम रावराणे, अरविंद रावराणे, सत्यवान रावराणे, विजय रावराणे, शरद नारकर आदी संचालक, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, डॉ.पाटील, आनंदीबाई रावराणे कॉलेज चे प्रभारी प्राचार्य नामदेव गवळी, वाभवे वैभववाडी नगरपंचायत चे विद्यमान शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती रोहन रावराणे, बांधकाम सभापती रणजीत तावडे, महिला बालकल्याण सभापती श्रद्धा रावराणे, वैभववाडी माजी सभापती मिनाताई बोडके, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, गंगाधर केळकर, कोल्हापूरचे उद्योजक सयाजीराव पाटील, कार्यक्रमास उपस्थित पत्रकार मारूती कांबळे, उज्वल नारकर, महेश रावराणे यांचे देखील शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लिहलेले लेख, कविता, चित्रे यांचे एकत्रित संकलन असलेल्या ‘अक्षरगंध’ या हस्तलिखिताचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात अग्रेसर भुमिका बजावतात असल्याबद्दल कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांना देखील सत्कार संस्था अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाच्या वतीने यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सुत्रसंचलन व्हि. एस. मरळकर, एन.व्ही प्रभू, पी.पी सावंत, एस .ए. सबनिस, एस.व्ही भोसले, यांनी केले. स्नेहसंमेलन प्रमुख म्हणून ए.जी.केळकर यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार , अनेक नृत्य, नाट्य संगीत कार्यक्रम यावेळी सादर केले. या कार्यक्रमाला वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, सचिव अर्जुन रावराणे, विक्रम रावराणे, अरविंद रावराणे, सत्यवान रावराणे, विजय रावराणे, शरद नारकर, प्रशालेचे प्राचार्य भास्कर नादकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, सज्जनकाका रावराणे, माजी सभापती मिनाताई बोडके, जि.प.सदस्य सुधीर नकाशे, वाभवे वैभववाडी नगरपंचायत चे शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती रोहन रावराणे, बांधकाम सभापती रणजीत तावडे, महिला बालकल्याण सभापती श्रद्धा रावराणे, बाळा कदम इतर नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी प्रतिनिधी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी. जे. सावंत यांनी केले.अतिशय उत्साहात प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला.

error: Content is protected !!