नंतर कोकणी माणसाला दोष द्या
मनसे सरचिटणीस उपरकर यांची टीका
कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांचे भाषण आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानपरिषद मधील भाषण व्हायरल होत आहे. गडकरींच्या म्हणण्यानुसार मुंबई गोवा नॅशनल हायवे 13 वर्षे का रखडला याचे स्पष्टीकरण केले.ठेकेदाराला कोण कसे सतावत आहे हे सांगताना गडकरी दिसतायत.मात्र त्याचा रोष कोकणी माणसावर ठेवत आहेत. केंद्रीयमंत्री गडकरी यांनी एकदा तळकोकणात हायवेवरून बाय रोड प्रवास करावा आणि पुणे बेंगलोर हायवेवरूनही करावा. त्यानंतर दोन्ही एक्सप्रेस हायवे तील कामातील फरक गडकरी याना समजेल अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.हायवे जमीन संपादन करताना झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा कोकणी माणसाचा हक्क आहे.केंद्रीयमंत्री गडकरी जर पुस्तक लिहीत असतील तर त्यांनी प्रशासनाने कशी जमीनमालकांची फसवणूक केली हेही नमूद करावे असे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले. ह्या हायवे वरील ब्रिज चा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने वर्क ऑर्डर निघूनही काम केले नाही. त्याला काम देताना प्रशासनाने कोणती माहिती घेतली होती ? रत्नागिरी जिल्ह्यातील दोन टप्पे असेच प्रलंबित राहिले. सिंधुदुर्गातील तळेगाव ते झाराप दरम्यान च्या टप्प्यातील कणकवली शहरातील एस एम हायस्कुल समोर दिलीप बिल्डकॉन ने बांधलेले उड्डाणपुल पहिल्याच पावसात कोसळले. या निकृष्ट कामाविरोधात आवाज उठवला.काहीजण कोर्टात गेले. न्यायालयात 3 वेळा अफीडेव्हीट देऊनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. कुडाळ आंबडपाल फाट्यावर बांधलेल्या अंडर पास मधून एसटीही जाऊ शकत नाही. ह्याविरुद्ध आवाज उठवला म्हणून कोकणी माणसाला दोष देऊ नये.कोकण रेल्वे प्रोजेक्ट ला कोकणी माणसणेच जमीन दिली.तो प्रकल्प निर्धोक पूर्ण झाला.











