प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात संस्था पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवार दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी प्रशालेच्या पटांगणावर संपन्न झाला. या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ काळात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व प्रशंसनीय जनसेवा केल्याबद्दल दिला जाणारा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन संस्था पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सपत्नीक गौरविण्यात आले. त्यांच्या या गौरवार्थ सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, सचिव अर्जुन रावराणे, विक्रम रावराणे, अरविंद रावराणे, सत्यवान रावराणे, विजय रावराणे,शरद नारकर आदी संस्था पदाधिकारी, प्राचार्य भास्कर नादकर, प्रशालेच्या स्नेहसंमेलन प्रमुख ए.जी केळकर. वैभववाडी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, सज्जनकाका रावराणे, माजी सभापती मिनाताई बोडके, जि.प.सदस्य सुधीर नकाशे. वाभवे वैभववाडी नगरपंचायत चे शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती रोहन रावराणे, बांधकाम सभापती रणजीत तावडे इतर विषय समिती सभापती ,नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी प्रतिनिधी, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













