खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील रामेश्वर नगर जि.प. शाळा खारेपाटण या शाळेला खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांनी नुकतेच शाळेच्या शौचालय इमारतीला स्वखर्चातून सुमारे ११०००/- रुपये खर्च करून पत्रे घालून दिले. खारेपाटण रामेश्वर नगर जि.प. शाळेच्या माजी शा.व्य.समितीच्या अध्यक्ष सौ नंदिनी पराडकर व पालक आणि शिक्षकांनी सातत्याने ही मागणी केली होती यांच्या या पाठपुराव्यामुळेच शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यात आली. खारेपाटण रामेश्वर नगर शाळेचे शिक्षक श्री धुळप सर,उज्वला गुरव,विद्यमान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच पालकांनी समाधान व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांचे आभार मानले.