कुंटणखाना कारवाई बद्दल पीआय अतुल जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान

डीएसपी अग्रवाल यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन आले गौरविण्यात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): दिनांक ७ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील बेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आजगाव येथील अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत एका आरोपीला अटक करून ३ पीडित महिलांची सुटका केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याहस्ते वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासाहित या कारवाईत सहभागी असणाऱ्या इतर पोलिसांचा प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे व कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या समवेत वेंगुर्ला पोलिस हवालदार सुरेश पाटील, महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान, पोलीस हवालदार गौरव परब, पोलीस नाईक मनोज परुळेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, पांडुरंग खडपकर, हेड कॉन्स्टेबल दादा परब, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा भाटे यांचाही प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!