आ.नितेश राणे यांच्या सहकार्याने शुकनदीतील गाळ काढल्यामुळे खारेपाटण मध्ये पूरस्थिती नाही ; रमाकांत राऊत

खारेपाटण (प्रतिनिधी) : गावातील शुक नदीतील पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी खारेपाटण मध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन खारेपाटण गावात पुराचे पाणी शिरत असे.मात्र यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सकार्यातून शुकनदीतील गाळ उपसल्याने खारेपाटण शहर यंदा पुराच्या विळख्या पासून वाचले असून खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावाला व येथील व्यापारी आणि नागरिकांना पुरपरिस्थीतीचा सामना करावा लागतो.विजयदुर्ग खाडीला जोडली गेलेली खारेपाटणची शुक नदी पूर्णतःहा गाळाने भरलेली असल्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याने नदीचे पात्र बदलून संपूर्ण पुराचे पाणी खारेपाटण शहरात घुसते परिणामी येथील नागरिकांचे व व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र ही बाब आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर खारेपाटण शुक नदीतील गाळ चींचवली ते खारेपाटण जैनपार स्मशान भूमी पर्यंत काढण्यात आला. परिणामी नदीचे पात्र रुंद व खोलगट झाल्यामुळे यंदा पुराचे पाणी खारेपाटण शहरात घुसले नाही.

आजपर्यंत खारेपाटण शुक नदीतील सुमारे ४०% एवढा गाळ उपसण्यात आला असून अजून ६०% एवढा नदीतील गाळ उपसा करण्याचे काम अजून बाकी असल्याचे देखील यावेळी खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यानी यावेळी सांगितले. तसेच उर्वरित नदीतील गाळ देखील खारेपाटण बंदरवाडी आझाद मैदान पर्यंत काढण्यात येणार असून शुक नदी गाळ मुक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान खारेपाटण मधील शुक नदीचे गाळ उपसाचे काम आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून व माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे झाल्यामुळे ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!