जीवन आनंद संस्थेच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील आश्रमांत स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा
खारेपाटण (प्रतिनिधी) : देशासाठी सीमेवर लढणे किवा शहिद होणे म्हणजे देशसेवा आहे. पण प्रत्येकाने त्यासाठी सीमेवर जायची गरज नाही. समाजातील कुठल्याही विषयावर सामाजिक भान ठेवून त्यावर कामकाज करणे.उदा. प्लास्टिक वापर न करणे, वृक्ष तोड रोखणे, अनावश्यक वस्तुचा वापर टाळणे, वस्तुचा गैरवापर न करणे, कायद्याचे उल्लंघन न करता कायद्याचे पालन करून सहकार्य करणे , निराधार व्यक्तीच्या सेवेसाठी शक्यतोपरी मदत करणे,आपल्या आईवडीलांसोबत वरिष्ठांचा मान सन्मान करणे हीच खरी देशसेवा आहे.आणि यातुनच राष्ट्राची व आपली उन्नती होईल.” असे प्रातिपादन म्हापसा गोवा येथील जेष्ठ विधिज्ञ श्री.सर्वज्ञ पाटील यांनी केले.
रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्थेच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील आश्रमांत आज देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा झाला. म्हापसा येथील संवेदना आश्रमात श्री.सर्वज्ञ पाटिल बोलत होते. संस्थेच्या संविता आश्रम पणदुर ता.कुडाळ येथे मा..सौ.राधा परब व मा. रूजुता परब यांच्या शुभहस्ते ७ ध्वजारोहन करण्यात आले. ओपा-खांडेपार गोवा येथील माँ आसरोघर आश्रमात श्री. नरेश दातये व मा. श्री.माधव बोडके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. केशव ब. हेडगेवार स्कूल ची मुलं व खांडेपार ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक मान.श्री संदिप परब यांचे सह प्रसाद आंगणे, आनंद काळे , संदिप राणे व उपस्थित होते.
संवेदना आश्रमातील कार्यक्रमास संस्थेचे हितचिंतक मित्र संदेश बुर्ये, जी.एस. आमोणकर विद्यामंदिर व सारस्वत काॅलेज चे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, प्रमुख पाहुणे ॲड. श्री सर्वज्ञ पाटील व श्री संदेश बुर्ये सर यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन समाजाप्रती प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असल्याबाबत माहीती दिली. जी.एस्. आमोणकर विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. आशिष कांबळी यांनी आभार प्रदर्शन केले.
विरारफाटा ता.वसई येथील येथील समर्थ आश्रमात संस्थेच्या विश्वस्त प्रज्ञा राणे यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. मान्यवरांचे मनोगत झाले.रत्ना लांघी व वंश अमर मोरे यांनी राष्ट्रभक्तीपर गीते म्हटली.यावेळी संस्थेचे खजिनदार रामचंद्र अडसुळे,टोकरे खैरपाडा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच किरण अरोलकर , लहु सांडिम, श्रुती भुवड,पुजा शिंदे, सुरज मोरे, रक्षिता पाटिल,भाईदास माळी, संपदा सुर्वे, सुनिता भंडारी, विश्वस्त अँड.किसन चौरे यांची प्रमुख उपस्थीती होती.रत्ना लांघी व गोविंद मार्गी यांनी संचलन केले.दिपाली मेघा+माळी यांनी आभार मानले.सर्व ठिकाणच्या कार्यक्रम आयोजनांत आश्रमांतील सेवा कार्यकर्ते व बांधवांचा सक्रीय सहभाग होता.