“रोटरी मुळे तुमच्या शहराला एक वेगळी ओळख निर्माण होईल.” – संजय रावराणे
खारेपाटण (प्रतिनिधी) : “रोटरी क्लबच्या माध्यमातून एका जागतिक दर्जाच्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थेशी तुम्ही एक रोट्रियन म्हणून आपोआप जोडले तर जालच. त्याच बरोबर रोटरी क्लबच्या स्थापनेमुळे तुमच्या शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण होईल.” असे भावपूर्ण उदगार रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्षसंजय रावराणे यांनी खारेपाटण येथे रोटरी क्लब स्थापना करण्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना काढले.
खारेपाटण हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात शनिवारी सायंकाळी ६.०० वाजता संपन्न झालेल्या या प्राथमिक सहविचार सभेला कणकवली रोटरी क्लब चे अध्यक्ष रवींद्र परब,असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, रोट्रियन डॉ.विद्याधर तायशेटे,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, पोलीओ फंड डायरेक्टर राजेंद्र परब,रोट्रियन संतोष टक्के, राजन बोभाटे,दीपक बेलवलकर,प्रशांत गुळेकर, प्रा.नामदेव गवळी,मुकुंद रावराणे, श्रीराम पाटील,सचिन रावरणे, असिस्टंट गवर्नरप्रमोद भोगटे सर आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थित जिल्ह्यातील रोट्रीयनचे खारेपाटण गावच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी खारेपाटण गावचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव संकेत शेट्ये,महेश कोळसुलकर, संतोष पाटणकर,योगेश गोडवे,भाऊ राणे,राजेंद्र वरुणकर, सुधीर कुबल,यशवंत रायबागकर, सुबोध देसाई,बबन तेली तसेच शिक्षक संतोष राऊत,राजेश वारंगे, रोहिदास शिंदे,श्री मोटे सर, पाडवी सर,श्री कोकाटे सर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सहविचार सभेत वैभववाडी रोटरी क्लबच्या वतीने पुढाकार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण या ऐतिहासिक शहरात रोटरी क्लब ऑफ खारेपाटण ची स्थापना करण्यात येणार असून सामाजिक सेवेचे भान असणाऱ्या व दातृत्वाची जान असनाऱ्या व्यक्तींनी यामध्ये पुढे येऊन सहभाग घ्यावा.जिल्ह्यातीलच नव्हे तर देशपातळीवरील सर्व रोटरी क्लबचे सदस्य आपल्या पठीशी खंबीरपणे उभे राहतील.असे प्रतिपादन रोट्रियन डॉ.विद्याधर तायशेटे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. तर रोटरी क्लब संदर्भातील संपूर्ण माहिती यावेळी वैभववाडी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संतोष टक्के यांनी उपस्थितांना दिली.
खारेपाटण शहरात लवकरच रोटरी क्लब ऑफ खारेपाटण ची स्थापना करून येथील विविध सामाजिक समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया असे आवाहन वैभववाडी रोटरी क्लबचे सचिव प्रशांत गुळेकर यांनी केले. यावेळी रवींद्र परब,राजेंद्र परब,श्रीम.नीता गोवेकर यांनी देखील मार्गदर्शन केले.या संपूर्ण सहविचार सभेचे सूत्रसंचालन श्री मंगेश गुरव यांनी केले.तर आभार संजय रावराणे यांनी मानले.















