कुडाळ (अमोल गोसावी) : तरुणांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून उद्योजक बनावे, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी आर. ए. गावडे यांनी वेताळ बांबर्डे येथे केले.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र आणि ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उद्योजकता परिचय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक शेळके, पाटील, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुष्मा साखरे, सरपंच वेदीका दळवी उपसरपंच प्रदिप गावडे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.











