फोंडाघाट- नवदुर्गा युवा मंडळ, नवीन कुर्ली यांच्यावतीने नवीन कुर्ली प्राथमिक शाळेस ” स्मार्ट टीव्ही ” भेट

नवदुर्गा युवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद : मुख्याध्यापिका रेणुका जोशी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सद्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांना विविध शैक्षणिक उपक्रम ऑनलाईन शिकता यावेत यासाठी वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवदुर्गा युवा मंडळाने शाळेतील मुलांचे शिक्षण डिझिटलाईज  होण्यासाठी “स्मार्ट टीव्ही” शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका जोशी मॅडम यांच्याकडे सुपूर्त केला त्यावेळी त्यांनी नवदुर्गा युवा मंडळ नेहमीच सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असते आणि त्यांचे काम कौतुकास्पद असते असे सांगून शाळेच्या वतीने   आभार व्यक्त केले.

या वेळी नवदुर्गा युवा मंडळाचे उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष  *श्री दिपक शिंदे*, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्षाक प्रिया दळवी, नवदुर्गा युवा मंडळाचे सल्लागार   अरुणोदय पिळणकर,मंगेश मडवी, खजिनदार प्रदीप आग्रे, सदस्य  सचिन साळसकर, अतुल डऊर, राजेश हुंबे,अनिल दळवी, सचिन परब,  तसेच श्री प्रकाश दळवी, व  सौ  पाटील ,सौ कामतेकर, सौ  तांबे  व सर्व शिक्षिका व विद्यार्थी वर्ग  उपस्थित होते.

error: Content is protected !!