वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत माध्यमिक गटातून माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकीसरे शाळेचे मूल्यमापन वैभववाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, कृषी अधिकारी शशिकांत बरसट, तंत्रस्नेही शिक्षक बोरकर सर व विषय तज्ञ स्वरा जाधव यांच्या तालुकास्तरीय कमिटीने पाहिले.
तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मूल्यमापनाअंती वैभववाडी तालुक्यातून माधवराव पवार विद्यालय,कोकिसरेने प्रथम क्रमांक पटकावला. प्रशालेचे नूतन मुख्याध्यापक शिवदास मधुसूदन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून हे यश प्राप्त झाले आहे. प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी शिनगारे यांनी केले.
संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या माधवराव पवार विद्यालयाने आपला दबदबा पुन्हा या निमित्ताने सिद्ध केला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये 100% निकालाबरोबरच , शिष्यवृत्ती परीक्षा, , NMMS परीक्षा , विज्ञान प्रदर्शन , ऑलिम्पियाड परीक्षा , इतर स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व ,निबंध स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी सतत आघाडीवर दिसतात.याचेच प्रतिबिंब आजच्या या निकालात दिसून आले. महालक्ष्मी शिक्षण मंडळ मुंबई चे अध्यक्ष दत्ताराम सोमा पवार, सचिव जनार्दन सखाराम नारकर व इतर सदस्य सल्लागार मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ यांनी या यशाबद्दल प्रशालेचे आणि सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.