मराठा जागृती मंच महाराष्ट्र यांच्या वतीने श्री महेश परब आणि सरपंच सौ. मानसी परब यांचा सत्कार

गावातच हॉटेल व्यवसाय सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मान


चौके ( प्रतिनिधी ): मालवण तालुक्यातील धामापूर गावचे रहिवासी श्री. महेश परब आणि सौ. मानसी परब आणि कु. दर्शन परब यांनी आपला मुंबई शहरातील व्यवसाय सांभाळत नुकतेच धामापूर सडा येथे “हॉटेल मराठा ” हे अद्ययावत हॉटेल सुरू केले आहे. पर्यटक आणि खवय्यांची सुरू झालेल्या पहिल्या दिवसापासूनच हॉटेल मराठा ला पसंती मिळत आहे. महेश परब यांनी सुरू केलेल्या हॉटेलमुळे गावातील तरुण आणि महिला अशा पाच सहा जणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. नोकरीसाठी मुंबईची वाट धरणाऱ्या अनेकांनी आदर्श घ्यावा अशा श्री महेश परब यांच्या या रोजगाराभिमुख व्यवसायाबद्दल मराठा जागृती मंच महाराष्ट्र यांच्या वतीने हॉटेल मराठा , धामापूर येथे उद्योजक महेश परब आणि त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. मानसी परब या धामापूर गावच्या विद्यमान सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी मराठा जागृती मंचाचे उपाध्यक्ष श्री. राम परब यांच्यासह माजी रणजी क्रिकेटपटू प्रा. विजय जोइल , श्री. शशिकांत गावडे , अभिमन्यू सावंत बबन परब, हनुमंत मराळ , प्रमोद परब , विश्वनाथ परब , महेश धामापूरकर , विलास मेस्त्री , आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!