चाकरमान्यांना कचरा न टाकण्याचे आवाहन

स्वच्छ्ता मिशन कडून खारेपाटण येथे उपक्रम

खारेपाटण (प्रतिनिधी) : स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्यावतीने मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथील चेक नाक्यावर स्वच्छता जनजागृती मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेला चाकारमान्यांनी अतिशय भरभरून प्रतिसाद देत आम्ही गाडीतील कचरा रस्त्याच्या कडेला टाकणार नाही देशातील पहिला पर्यटन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सदरची मोहीम जेष्ठ पत्रकार गणेश जेठे यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण चेकपोस्ट समोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरदोन दोन ते अडीच तास राबविण्यात आली. याप्रसंगी स्वच्छतेचा संदेश असणारी ३०० पेक्षी अधिक पत्रके चाकरमानी प्रवास्यांना वाटण्यात आली.

तत्पूर्वी राष्ट्रगीताने आणि स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन या अभिनयाचा प्रारंभ झाला. उपस्थित स्वच्छतादुतांचे व मान्यवरांचे गणेश जेठे यांनी स्वागत केले.प्रास्ताविक करताना त्यांनी या मोहिमेची ध्येय उद्दिष्ट्ये सांगून आपणाला आपला जिल्हा स्वच्छ आणि सुंदर बनवायचा आहे, त्यासाठी आपल्या सर्वांची मोलाची साथ मिळत असल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. याप्रसंगी खारेपाटणच्या सरपंच सौ.प्राची इस्वलकर,नडगिवेचे सरपंच माधवी मनियार व शिडवणे गावचे सरपंच रवींद्र शेट्ये आदी मान्यवरांनी या स्वच्छता जनजागृती मोहिमेचे विशेष कौतुक करून गावागावातून ही चळवळ उभी राहिली पाहिजे असे सांगत आपणही या स्वच्छता मिशनाचे दूत होणार असल्याचे नमूद केले.या मोहिमेत सहभागी स्वच्छतेच्या दुतांनी मुंबई व इतर ठिकाणांहून सिंधुदुर्ग येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रथम स्वागत केले आणि त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व आपल्या गाडीत रिकाम्या असलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाऊची रिकामी पाकिटे व इतर तत्सम कचरा रस्त्याच्या कडेला फेकून देऊ नका. गाडीत ठेवा व घरी गेल्यावर योग्य ती विल्हेवाट लावण्याची तसेच मोदक, अगरबत्ती व इतर साहित्याची कव्हर प्लास्टिक व इतर प्लॅस्टिक वस्तू नदी ,नाल्यात किंवा रस्त्याच्या कडेला टाकू नका, जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी नाले तुडुंब वाहत आहेत त्यामुळे खोल पाण्यात उतरून आपला जीव संकटात टाकू नका असेही आवाहन करीत,आपला प्रवास सुखाने करण्याची विनंती केली.

यावेळी लक्झरी,छोटी वाहणे, कार गाड्या,एस.टी.बसलाही थांबून पत्रके वाटून स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छता दुतांने केलेल्या आवाहनाला चाकरमानाने अतिशय सकारात्मक आणि भरभरून प्रतिसाद देत गणपती बाप्पा! मोरया!! जयघोष करीत कचरा बाहेर टाकणार नाही, महामार्गाबरोबरच, गाव व पर्यायाने जिल्हा स्वच्छ ठेवण्याचे अभिवादन देत मार्गस्थ झाले. या मोहिमेत सहभागी झालेल्या व स्वच्छता अभियानाचा ब्रँड अंबॅसिटर म्हणून प्रसिद्ध असलेला कोंडीये गावचा सुपुत्र व इयत्ता सातवीतील रोहन मोंडकर व तळेरे नं.१ प्राथमिक शाळेतील इ.१ली तील विद्यार्थी कु.शर्वील मारकड या छोट्या स्वच्छतादूतांनी केलेल्या विनंतीला प्रवास्यांनी भरभरून प्रतिसाद देत स्मितहास्याने त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक केले.

या स्वच्छता जनजागृती मोहीमेला जेष्ठ पत्रकार व या मोहिमेचे प्रमुख गणेश जेठे, खरबटेंच्या सरपंच प्राची इस्वलकर,नडगीवेच्या सरपंच माधवी मणियार, शिडवणेचे सरपंच रवींद्र शेट्ये,खारेपाटण पोलीस चेकपोस्टचे पोलीस नाईक उद्धव साबळे,प्रशांत कांबळे, महामार्ग पोलीस देवेंद्र मुंबरकर, मंडल अधिकारी दिलीप पाटील,प्रदीप फोपे,अनिल मेस्त्री,पत्रकार मोहन पडवळ,दत्तात्रय मारकड,सचिन राणे,गुरुप्रसाद सावंत,अस्मिता गिडाळे,तुषार नेवरेकर,छोटे स्वच्छतादूत रोहन मोंडकर, शर्वील मारकड व अन्य स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!