श्री ब्राह्मण देव सेवा समिती सुकळवाड आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी प्रथम

सद्गुरु प्रसादीक भजन मंडळ वडखोल द्वितीय तर नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ कसाल ने तृतीय क्रमांक पटकावला

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :श्री ब्राह्मण देव सेवा समितीच्या वतीने श्री देव ब्राह्मण च्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ५ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत जिल्ह्यातील सहा नामवंत भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेची सुरुवात नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ कसाल चे बुवा सुंदर मेत्री यांच्या भजनाने झाली. ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार अशी झाली. भजन प्रेमींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत बुवा सुंदर मेत्री (कसाल), चेतन तळगावकर (तळगाव), संकेत मेत्री (कट्टा), सिद्धेश नाईक (तुळस) पुरुषोत्तम परब (वडखोल), अमित तांबोळकर(तंबोळी) यांनी सहभाग घेतला होता. तर संगीत विशारद बुवा अजित गोसावी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

अतिशय रंगतदार अशा झालेल्या या भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी बुवा अमित तांबूळकर यांनी प्रथम ,सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ वडखोल बुवा पुरुषोत्तम परब यांनी द्वितीय, तर नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ कसाल चे बुवा सुंदर मेस्त्री यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उत्कृष्ट कोरस म्हणून समर्थ प्रासादिक भजन मंडळ कट्टा ,उत्कृष्ट पकवाज म्हणून पांडुरंग परब तर उत्कृष्ट पेटीवादक म्हणून बुवा सिद्धेश नाईक यांना गौरविण्यात आले. या सर्व विजेत्या भजन मंडळांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषक व प्रमाणपत्र, चषक देऊन गौरविण्यात आले. तर सर्व सहभागी भजन मंडळांना रोख मानधन व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी स्पर्धा पुरस्कर्ते राजन पावसकर, सरपंच युवराज गरूड ब्राह्मणदेव सेवा समिती अध्यक्ष अनिल पालकर,उपाध्यक्ष प्रकाश राऊळ ,सचिव किशोर पेडणेकर, कोषाध्यक्ष संतोष पाताडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव मसुरकर, ब्राह्मणदेव क्रीडा मंडळ अध्यक्ष विलास पेडणेकर, रूपेश गरूड, नागेश पाताडे,बाळा टेंबुलकर, विलास मसुरकर, संतोष बिलये,प्रल्हाद वायंगणकर , भाऊ पाताडे ,देविदास प्रभुखोत.स्पर्धा मार्गदर्शक अरूण पालकर परिक्षक अजित गोसावी.आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!