कणकवली (प्रतिनिधी) : एसटी कामगार संघटनेचे विभागीय कार्यालय युनिट अध्यक्ष , विभागीय कार्यालयातील वाहतूक शाखेतील कर्मचारी नारायण शंकर चव्हाण ( वय 57 ) यांचे ओरोस येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. संत रोहिदास समाज मंडळ घोणसरी चे ते सक्रिय कार्यकर्ते होते. नारायण चव्हाण यांच्यावर घोणसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.विभागीय नियंत्रक अभिजित पाटील, विभागीय वाहतूक विक्रम देशमुख, एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप साटम, विभागीय सचिव विनय सावंत, विभागीय कार्यालय युनिट सचिव अमिता राणे, दिलीप जाधव, संजय नर आदींनी चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. नारायण चव्हाण यांच्या पश्चत आई, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई , भाऊ, बहीण, वहिनी , भावोजी, नातवंडे असा परिवार आहे.