ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारीणीची बैठक संपन्न

सर्व पदाधिकारी व सदस्यांना ओळखपत्र प्रदान

आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारीणी तसेच सर्व तालुका पदाधिकारी यांची संयुक्त सर्वसाधारण सभा कणकवली गोपुरी पर्यटन निवास केंद्र या ठिकाणी संपन्न झाली.या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते व सिने कलाकार अभय खडपकर उपस्थित होते.

यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे पदाधिकारी व सदस्य यांची ओळख पत्र (आयडी. कार्ड ) “रात्रीस खेळ चाले” तसेच झी मराठीवरील मालिका “नवा गडी नवं राज्य” फेम “आबा” म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते, उत्कृष्ट निवेदक अभय खडपकर व महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते तसेच कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते ओळख पत्र वितरित करण्यात आली.त्याचबरोबर संघटनेच्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यात आली.

तसेच मालवण तालुका संघटनेचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल मालवण तालुका पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते व सिने कलाकार खडपकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सौ.प्रेरणा जुवेकर यांचा वाढदिवस देखील संघटनेच्या वतीने यावेळी साजरा करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी ह्यूमन राईट संघटनेच्या उत्कृष्ट कार्याचा अभिनंदन करून गौरवोद्गार काढले व समाधान व्यक्त केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष मंदार काणे, जिल्हा सचिव अर्जुन परब, जिल्हा सल्लागार प्रकाश तेंडुलकर, जिल्हा संघटक डॉ.वैभव आईर, जिल्हा महिला संघटक सौ.मिनल पार्टे, जिल्हा निरीक्षक सौ.मानसी परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष संजय शेळके, निरिक्षक प्रकाश माईणकर तसेच इतर सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!