खारेपाटण (प्रतिनिधी): भारतीय संस्कृती परंपरेतील पितृपक्षाला कालपासून सुरूवात झाली. समाजातील अनेक सहृदयी मंडळी पितृ पक्षादरम्यान विविध ठिकाणच्या आश्रमांतील बांधवांसाठी अन्नदान करून सत्पात्री दान देतात. काल पितृपक्षाच्या प्रथमदिवशी बोरीवली येथे राहणारे रूमाले दाम्पत्याने जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात बांधवांसाठी भोजन दानाचे आयोजन केले होते. सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन सतिश रूमाले यांनी रेल्वेतील कामा दरम्यान अभ्यास करून कायद्याची पदवी घेतली असून सद्या ते केंद्रीय प्रशासकीय ट्रँब्युनल व राज्य प्रशासकीय ट्रंब्युनलमधे (कँट व मँट मधे ) प्रँक्टीससाठी कार्यरत आहेत. ट्राँब्युनलच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार मधे काम केलेल्या लोकसेवकांचे अडलेले पेन्शन, ग्रँच्युईटी सारखे विविध प्रश्न आणि अडचणी सोडवण्याचे ते कार्य करतात. आश्रमातील बांधवांचे भोजन झाल्यावर रूमाले दाम्पत्यांसह तुमच्या सोबत आलेल्या सहकाऱ्यांनी आश्रमातच सर्व मित्र मंडळींनसह आश्रम मधील बांधवांसमवेत स्नेह भोजन केले. यावेळी जितेंद्र व भावना जितेंद्र पंड्या, पार्थ पंड्या,वैभव लाड,अल्पेश दुबळा,मनोज व गुणवंत बरखडा,धीरज शिरोय्या या मित्र मंडळींची स्नेहभोजन प्रसंगी विशेष उपस्थीती होती. अँड.रूमाले कुटुंबिय आधी नालासोपारात राहत असत. आता ते बोरिवलीत राहायला गेले असून तेथील बिल्डिंगमधील शेजा-यांना ते आपल्या समवेत आश्रमात घेवून आले होते. नालासोपा-यातील शुभांगी वांच्छू (गायीका) यांनी समर्थ आश्रमला जोडलेला हा एक परिवार आहे. असे यावेळी सांगितले.