विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
मसुरे (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवी मंदिरात एकवीस दिवसाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केले आहेत. १ ऑक्टोबरला सायंकाळी महाआरती, रात्री बुवा उत्तम मुणगेकर तसेच बुवा सुभाष मसुरकर (भंडारवाडी) यांचे संगीत भजन, २ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री १० वाजता यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद मालंडकर यांच्या सौजन्याने बाल मित्रमंडळ आचरा वरची वाडीचे दिंडी भजन आणि श्री पावणाई दिंडी भजन दाभोळे यांचे दिंडी भजन, त्यानंतर बुवा समिर महाजन व बुवा राजेंद्र प्रभू यांची संगीत भजने, ३ ला बुवा अविनाश राऊत (कारिवणेवाडी) व बुवा रामचंद्र घाडी (सडेवाडी) यांची संगीत भजने, ४ ला सायंकाळी ७ वाजता महाआरती, त्यानंतर बुवा विनोद सावंत (सावंतवाडी) व बुवा दीपक धुवाळी (सडेवाडी) यांचे संगीत भजन, रात्री १० वाजता ‘आंबा बागायतदार मुणगे’ यांच्या सौजन्याने पारंपरिक डबलबारी भजनांचा जंगी सामना पावणाई देवी प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाटचे (ता. कणकवली) बुवा हेमंत तेली विरुद्ध कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळबुद्रुकचे (ता. कणकवली) बुवा सुजित परब, ५ ला सायंकाळी महाआरती, रात्री ९ वाजता रिक्षा चालक मालक संघ, व्यापारी आणि मित्रमंडळ मुणगे भगवती मंदिर यांच्या सौजन्याने ब्राम्हणदेव महिला मंडळ नाद-भोळेवाडी (ता. देवगड) यांचे समईनृत्य, रात्री बुवा अरविंद सावंत (सावंतवाडी) यांचे संगीत भजन, ६ ला सायंकाळी महाआरती, त्यानंतर बुवा दिपक तुरी (देऊळवाडी) व बुवा धाकोजी सावंत (सावंतवाडी) यांची संगीत भजने, ७ ला सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापुजा, रात्री १० वाजता २०x२० डबलबारी भजनाचा जंगी सामना श्री पावणाई प्रासादिक भजन मंडळ वानिवडेचे (ता. देवगड) बुवा आनंद ऊर्फ बाबा हरम विरुद्ध श्री देवी सातेरी प्रसादिक भजन मंडळ पावशीचे (ता. कुडाळ) बुवा अरुण घाडी. ८ ला दुपारी ४ वाजता श्री भगवती दशावतार नाट्य मंडळ मुंबई- डोंबिवलीचे मालक प्रकाश पांडुरंग लब्दे यांचे महान पौराणिक दशावतारी नाटक ‘असुर संग्राम’. सायंकाळी महाआरती, रात्री बुवा पवन बोरकर (आडवळवाडी) यांचे संगीत भजन, ९ ला दुपारी दीडला आरती त्यांनतर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन सोहळ्याला सुरूवात होणार आहे. आडवळवाडी येथील समुद्रामध्ये सायंकाळी विसर्जन करण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवी भगवती देवस्थान समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.