आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या इयत्ता सहावी मध्ये शिकणा-या प्रथमेश गोविंद सावंत याची नवोदय विद्यालय मध्ये शिक्षणासाठी निवड झाली आहे. यापूर्वी याच प्रशालेच्या गौरी प्रदीप गराठे हिची निवड झाली होती.प्रथमेश याला मुख्याध्यापक टकले, शिक्षक प्रभा हळदणकर-बांवकर, संजय जाधव, मिनाक्षी सुर्वे, प्रभूदास आजगांवकर, आडे, वसावे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा कमिटी सदानंद राणे, अँड समृद्धी आसोलकर, अशोक सावंत, संतोष वायंगणकर, दिपक सुर्वे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या यशाबद्दल प्रथमेश याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.