खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या मुंबई सांताक्रुज येथील कार्व्हर डे नाईट शेल्टरच्या माध्यमातून दि. १०आँक्टोबर – २०२३ रोजी जागतिक बेघर दिनी वाकोला ब्रीज येथे गरजू बेघर निराधार नागरिकांना ब्लँकेट्सचे वाटप नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी समाज विकास अधिकारी सुरेश पालवे, संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक व विश्वस्त नरेश चव्हाण, डोनर अमिषा ओस्वाल, विश्वस्त किसन चौरे , निवारा केंद्राच्या व्यवस्थापक संपदा सुर्वे ,नम्रता जुवळे,अनिल पवार यांची उपस्थीती होती.
मुंबई महानगरपालिके अंतर्गत दीन दयाळ उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान – शहरी बेघर योजने अंतर्गत कार्व्हर डे नाईट शेल्टर चे कार्य सुरू आहे. जगातील १.५ कोटी लोकांना विविध कारणांनी बेघर जीवन जगावे लागते.आपल्या भारतृ देशात २० लाखाहून अधिक लोक सद्यस्थीतीत बेघर आणि रस्त्यावरचे निराधार असे जीवन जगत आहेत. बेघर आणि निराधार नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १० आँक्टोबर हा दिवस जगभर जागतिक बेघर दिन म्हणून पाळला जातो.
बृहन्मुंबई महानगर पालिका अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत..संचालक नियोजन विभाग सौ. प्राची जांभेकर मॅडम, समाज विकास अधिकारी श्री.सुरेश पालवे सर व शहरी अभियान व्यवस्थापक सौ. विभा जाधव मॅडम आणि जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संदिप परब यांच्या मार्गदर्शनानुसार कार्व्हर डे नाईट शेल्टर – बेघर निवारा केंद्र चालविण्यात येत आहे. कार्व्हर डे नाईट शेल्टर बेघर निवारा केंद्राच्या व्यवस्थापक संपदा सुर्वे यांची कार्यक्रमाच्या संयोजनात भुमिका राहिली. दिपक अडसुळे , रत्ना लांघी, कविता कदम, गोविंद मार्गी यांचेसह केंद्रातील बांधव यावेळी उपस्थित होते.