आचरा (प्रतिनिधी ): सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक – मालक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक-मालक यांच्या वतीने सोमवार १६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे संघटनेच्या वतीने स्वागत तसेच रिक्षा चालक – मालक यांच्या न्याय हक्कांच्या मागणीचे निवेदन देण्यात येईल. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकार नंदकुमार काळे यांची सदिच्छा भेट संघटनेच्या वतीने भेट घेऊन रिक्षा व्यावसायिकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात चर्चा करून लेखी निवेदन देण्यात येणार आहे. याप्रसंगी रिक्षा-टॅक्सी महासंघाचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष संतोष नाईक तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय शारबिंद्रे व जिल्ह्यांतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालकांनी व सर्व तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी तसेच संघटनेच्या सभासदांनी वेळेवरती उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हा सचिव सुधीर पराडकर यांनी केले आहे.