आचरा (प्रतिनिधी): आचरा महसूल मंडळातील आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 नुसार मतदान केंद्रामधील अठरा वर्षे पूर्ण झालेले उमेदवार, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, मयत मतदार वगळणी तसेच पदवीधर मतदार नोंदणी, याबाबत भारत निवडणूक आयोग तसेच मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी केलेल्या सूचनेनुसार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ आणि मा.सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मालवण यांचे आदेशानुसार दिनांक २५आक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय चिंदर, दिनांक २६ आक्टोंबर ग्रामपंचायत कार्यालय आचरे व दिनांक २७ आक्टोंबर ग्रामपंचायत कार्यालय वायंगणी येथे शिबीर आयोजित करण्यात आलेली आहेत. सदर शिबीराचे ठिकाणी ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहून सदरचे फाॅर्म स्विकारणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी आपले मतदार यादीतील नावाची तपासणी करून दुरुस्ती असल्यास आवश्यक ते पुराव्याचे कागदपत्र जोडून फॉर्म भरून द्यावेत. तसेच आपले कुटुंबातील कोणी मतदार व्यक्ती मयत असल्यास मयत दाखला देऊन मयत मतदाराचे नाव कमी करुन घ्यावे, कोणी मतदार व्यक्ती कायम स्वरुपी बाहेर गावी स्थलांतरित झाल्यास त्याचेही नाव कमी करुन घ्यावे. तसेच आपले कुटुंबातील दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या व्यक्तिंची नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करुन घ्यावी. असे आवाहन आचरा मंडळ अधिकारी अजय परब यांनी केले आहे.