आचरा (प्रतिनिधी): युवा वर्गाला योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणात गती प्राप्त होऊ शकते व शहराकडे होणारे स्थलांतर कमी होऊन ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध होऊ शकतो या दृष्टीने केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचरा पिरावाडी हायस्कूल येथे आँनलाईन पद्धतीने करण्यात आले. भारत हा जगातील सर्वात युवा देश आहे. भारतातील युवा वर्ग ही आपली खूप मोठी आणि महत्त्वाची साधन संपत्ती आहे. या युवा वर्गाला योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणात गती प्राप्त होऊ शकते. महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अनेक अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक युवतींना कौशल्य प्रधान करण्यासाठी व त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी सतत वेगवेगळ्या योजना राबवत असतो याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावा याकरता पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करीत आहे याचे शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी साडेचार वाजता ऑनलाईन पद्धतीने पिरावाडी हायस्कूल येथे झाला. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळोसे, तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, स्मीता लगोटे, मंडल अधिकारी अजय परब, डॉ शामराव जाधव, सिंधुदुर्ग कौशल्य रोजगार केंद्राच्या शिवानी गरड, ग्रामपंचायत प्रशासक विनायक जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सचिन संखे, अमित खेडेकर यांसह बहुसंख्य विद्यार्थी, आरोग्य सेवक, शिक्षक, ग्रामस्थ पोलीस पाटील आदी उपस्थित होते.