आचरा (प्रतिनिधी): आचरा येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन संलग्न) या संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी ठीक 4 वाजता विविध प्रयोगातून ‘विज्ञानाची कास धरा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विजय चौकेकर हे सिंधुदुर्ग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव असून ते महाराष्ट्र शासनाच्या अंधश्रद्धा निर्मूलन परिपत्रके आणि प्रबोधन याविषयी आपले विचार मांडणार आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, बाबांची भोंदूगिरी, अंधश्रद्धा निर्मूलन, वैचारिक भूमिका, अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि नीती विचार या विषयावर विविध प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन करणार आहेत. सदर प्रबोधनपर मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी सर्वांनी वेळीच उपस्थित राहण्याचे निमंत्रण अशोक कांबळी, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे आणि सर्व पदाधिकारी कार्यकारीणी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे यांनी केले आहे.