२६ रोजी डबलबारी भजन सामना
मसुरे (प्रतिनिधी): मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ गडघेरा बाजारपेठ यांच्या वतीने मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील साई मंदिर येथे दिनांक २४ ते २६ ऑक्टोंबर दरम्यान साई पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमा होणार आहेत..दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी सकाळी पाच वाजता काकड आरती व साईंची विधिवत पूजाअर्चा सकाळी अकरा वाजता श्री सत्यनारायण महापूजा. पूजा मानकरी प्रसाद बागवे उभयता.
दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद.संध्याकाळी सात वाजता मंदिर सभोवती श्री साई पालखी मिरवणूक आणि आरती, प्रसाद वाटप संध्याकाळी ८ वाजता दत्तप्रसादिक भजन मंडळ गडघेरा यांचे सुश्राव्य भजन रात्री ९ वाजता भरतगड प्रसादिक भजन मंडळ गडघेरा यांचे भजन दिनांक २५ ऑक्टोंबर सकाळी सहा वाजता विधिवत साईंची पूजाअर्चा, दुपारी बारा वाजता महाआरती, संध्याकाळी सात वाजता मंदिर सभोवती श्री साई पालखी मिरवणूक आणि महाआरती..रात्री ८ वाजता बजरंग बली प्रसादिक भजन मंडळ मसुरे कावावाडी यांचे सुश्राव्य भजन रात्री ९ वाजता स्थानिक विविध भजने आणि मसुरे गावामध्ये श्री साईंचा झुणका भाकर प्रसाद वाटप कार्यक्रम.दिनांक २६ ऑक्टोंबर सकाळी सहा वाजता साईंची विधिवत पूजाअर्चा.दुपारी १२ वाजता श्री साई भंडारा, रात्री ८ वाजता टोकळवाडी प्रसादिक भजन मंडळ बुवा संतोष मसुरकर यांचे सुश्राव्य भजन रात्री ९ वाजता ट्वेंटी-ट्वेंटी डबल भजन बारी स्वयंभू प्रसादिक भजन मंडळ पियाळी बुवा संतोष कानडे, मृदुंग योगेश सामंत, तबला विकास देवळे विरुद्ध डुंगो कमाला प्रसादिक भजन शेलपि, बुवा दिनेश वागदेकर, मृदुंगमणी सचिन राणे, तबला अजित मार्गी या भजनी बुवांमध्ये होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन साईकृपा मित्र मंडळ मसूरे गडघेरा बाजारपेठ यांनी केले आहे.