मसुरे (प्रतिनिधी): श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे खंडे नवमी निमित्त शस्त्र पूजा करण्यात आली. जेष्ठ शिक्षक प्रणय महाजन यांच्या हस्ते ऑटोमोबाइल व इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यशाळेत विविध हत्यारे व उपकरणांची पूजा करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन. जि. वीरकर, हरीश महाले, गुरुप्रसाद मांजरेकर, स्वप्नील कांदळगावकर, झुंजार पेडणेकर, कुमठेकर, मिताली हिर्लेकर, प्रियांका कासले, एन एल बागवे, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू आदी सह विध्यार्थी उपस्थित होते.