आचरा (प्रतिनिधी) : वाचाल तर वाचाल या उक्तीस अनुसरून रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा तर्फे नवनवीन वाचकांना वाचनसंस्कृतीत आणण्यासाठी विविध योजना राबवित असते. याच अनुषंगाने संस्थेच्या सभासदांसाठी एक वर्ष कालावधीसाठी फक्त ५०रु मध्ये १००दिवाळी अंक योजना राबवित आहे .यात आरोग्य, नवनवीन पाककृती बाबत माहिती देणारे दिवाळी अंक, कथा, विनोदी साहित्य, बालसाहित्य, चित्रपट, ज्योतिष,कला, क्रीडा, मनोरंजन इत्यादी विषयक साहित्य वाचायला मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त सभासदांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन(दादा) बापर्डेकर यांनी केले आहे.