झुंजार मित्र मंडळ खारेपाटणने गेले नऊ दिवस साजरे केले विविध कार्यक्रम
खारेपाटण (प्रतिनिधी ) : खारेपाटण येथील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव उस्तवाची बुधवारी २५ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी देवीच्या विसर्जन मिरवणुकीने व ढोल ताशांच्या गजरात तसेच मर्दानी ऐतिहासिक मर्दानी साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकानी सांगता करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने खारेपाटण मधील भाविक विसर्जन मिरवणुकीत सामील झाले होते.
झुंजार मित्र मंडळाच्या वतीने खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.गेले नऊ दिवस मंडळाचे अध्यक्ष श्री संकेत शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सव निमित्त विविध भरगच्च कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात आले होते. यामधील रेकॉर्ड डान्स स्पर्धा ,फुगडी स्पर्धा, उखाणे घेणे स्पर्धा,पाककला स्पर्धा,लकी ड्रॉ स्पर्धा नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरल्या.तसेच “आजच्या पिढीतील शिव छत्रपतींचा खरा मावळा”.या विषयावर प्रसिद्ध शिववव्याख्याते श्री सौरभ कर्डे यांनी दिलेले व्याख्यानाने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
खारेपाटण येथील सार्वजनिक नवरात्रौत्सवला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या असून आमदार नितेश राणे खासदार विनायक राऊत यांनी देखील सदिच्छा भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.झुंजार मित्र मंडळाच्या वतीने विविध शेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा देखील सत्कार करण्यात आला. देवीच्या विसर्जन मिरवणुकीत खारेपाटण बाजारपेठेत कोल्हापूर कागल येथील लहान मुलांच्या पथकाने चित्तथरारक ऐतिहासिक साहसी मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवून भाविकांचे व ग्रामस्थांची मने जिंकली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झुंजार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संकेत शेट्ये, उपाध्यक्ष संजय कोळसुलकर,सचिव – दिगंबर राऊत,खजिनदार – महेश कोळसुलकर,रमेश जामसंडेकर, संकेत लोकरे,प्रज्योत मोहिरे,संतोष गाठे,तेजस राऊत,गणेश कारेकर, गणेश लवेकर,श्री.पाटील,भूषण कोळसुळकर,संतोष पराडकर,विनोद राऊत, आदी अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.