विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर ची कुडाळमध्ये ओपीडी

कुडाळ सह लगतच्या तालुक्यातील नेत्ररूग्णांना मिळणार लाभ

कुडाळ (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर ची दसऱ्याच्या मुहूर्तावर कुडाळमध्येही ओपीडी सुरू करण्यात आली असून त्याचे उदघाटन विवेकानंत नेत्रालय च्या पूनम जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कुडाळ पोस्ट ऑफिस शेजारी कुडाळेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स मध्ये पहिल्या मजल्यावर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नेत्ररूग्णांना ओपीडी ची सेवा मिळणार आहे.यासाठी रुग्णांनी मोबाईल क्रमांक 9850849315 / 8408803536 येथे संपर्क साधावा.

error: Content is protected !!