शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 3 महिने सश्रम कारावास

दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग पोलीस आपली सेवा बजावत असताना त्या शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रमुख न्यायधिष एस जे भारुका यांनी ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे येथील एकनाथ शिवाजी गवस असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी आई शुभांगी शिवाजी गवस व बहिण सुप्रिया अमित जगदाळे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. महिला पोलिस नाईक रेजिंटा बेंजामीन डीसोजा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणी तपास करीत असताना २० व २१ मे २०२० रोजी आरोपी यांच्या घरी हा प्रकार घडला होता.

error: Content is protected !!