नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष हर्णे यांच्या हस्ते सिध्दार्थनगर मधील अंगणवाडीचे लोकार्पण

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील सिद्धार्थनगर येथे कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. सिद्धार्थनगर येथे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार अंगणवाडी ची सुसज्ज अशी नूतन इमारत बांधण्यात आली. त्याचे उदघाटन आज संपन्न झाले.यावेळी नगरसेविका,माजी नगरसेवक गौतम खुडकर, तसेच स्थानिक नागरिक, पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!