मात्र सलग ३ तास रांगेत उभे रहावे लागत असल्याने महिलांची तीव्र नाराजी
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस टी महामंडळाने महिला प्रवाशांना एस टी बस च्या तिकिटीमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या उद्देशाने राज्यात सर्वत्र बंधनकारक केलेल्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) ऑनलाइन नोंदणी करून काढून घेण्यासाठी आज बुधवार दि.२८ ऑक्टोबर २०२६ रोजी खारेपाटण एस टी बस स्थानक येथे घेण्यात आलेल्या NCMC कार्ड कॅम्प साठी दशक्रोशीतील महिला लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मात्र या हे कार्ड देण्यासाठी एस टी महा मंडळाने ज्या खाजगी एजंट ची नेमणूक केली होती.ती एकच व्यक्ती असल्याने सुमारे २०० पेक्षा अधिक महिला यावेळी उपस्थित होत्या.यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिलांची संख्या सर्वाधिक होती.त्यामुळे NCMC कार्ड मिळविण्यासाठी महिलाना सलग ३ तास रांगेत उभे रहावे लागत असल्याने तसेच येथे बसण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने महिला वर्गांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
एस टी महामंडळाच्या वतीने जर अशा NCMC कार्ड कॅम्पचे आयोजन करायचे असेल तर त्या ठिकाणी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या व्यवस्थापनाची सोयी सुविधांची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली पाहिजे होती.अशावेळी एक सवलतीचे कार्ड काढून घेण्यासाठी तासनतास गर्दीच्या ठिकाणी विशेष करून ज्येष्ठ महिलाना रांगेत उभे राहून प्रतिक्षा करावी लागत असेल किंवा या गर्दीत एखादी महिला चक्कर येऊन पडली तर त्याला जबाबदार कोण ? अशावेळी मग “भीक नको पण कुत्र आवर ” असे म्हण्याची वेळ आता आली आहे.















