इन्सुली शाळा क्र. ६ येथे जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेचा शुभारंभ

जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या हस्ते मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

बांदा (मंगल कामत) : इन्सुली येथील शाळा क्रमांक ६ मध्ये शाळेतील विद्यार्थी तसेच अंगणवाडीतील बालकांना जंतनाशक गोळ्या देऊन जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि बालकांना जंतसंसर्गापासून संरक्षण मिळावे, यासाठी जंतनाशक गोळ्या देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला डॉ. भाग्यवंत, डॉ. दिग्विजय जाधव, देसाई सिस्टर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रावणी सावंत, शिक्षिका परब बाई, अंगणवाडी शिक्षिका मोडक बाई, सी.आर.पी राऊळ, अंगणवाडी मदतनीस लोचनी पालव आणि पालक शिल्पा पालव उपस्थित होते.

यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उपस्थितांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!