कणकवलीत संस्था पदाधिकारी आणि माजी कर्मचाऱ्यात वाद ; कॉलेज आवारातच दे दणादण फ्रिस्टाईल

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या आवारात संस्था पदाधिकारी आणि संस्थेच्या कॉलेज चा माजी कर्मचारी तथा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यात शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर अरे तुरे च्या भाषेत झाल्याचे समजताच संस्था पदाधिकाऱ्यांच्या सुपुत्रांनी घटनास्थळी धाव घेतली. पारा चढलेल्या एका पुत्राने त्या माजी कर्मचाऱ्याला बुकलून काढले. कानपूर लाईन गरम करतानाच त्या कर्मचाऱ्याचे शर्टही फाडले. अचानक झालेल्ल्या हल्ल्यातून सावरल्यानंतर त्या माजी कर्मचाऱ्यानेही प्रतिकार करत त्या पुत्राची कानपुर लाईन गरम केल्याची चर्चा आहे. दरम्यान हे प्रकरण हातघाईवर जाताच उपस्थितांनी मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले. पण ह्या घटनेने बघ्यांचे चांगलेच मनो “रंजन” झाले असून या प्रकाराची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. कणकवली शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या इमारतीत शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी तथा संस्थेचा माजी कर्मचारी मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी गेला होता. त्यावेळी संस्थेचा पदाधिकारी आणि त्या माजी कर्मचाऱ्यांत शाब्दिक वाद झाला. ह्या वादाची घटना संस्था पदाधिकाऱ्याच्या सुपुत्रांच्या कानावर पोचताच त्यांनी कॉलेजमध्ये धाव घेतली. आणि त्यानंतर पुढील घटना घडली. दरम्यान या घटनेची जोरदार चर्चा कणकवली शहरात सुरू आहे.

error: Content is protected !!