रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे-कोष्टीवाडी मित्रमंडळातर्फे आयोजित केलेल्या रेकॉर्ड स्पर्धेत लहान गटात किमया पारकर तर मोठ्या गटात दिव्या सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

कोष्टीवाडी मित्र मंडळ, वरवडे (रजि.) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दसºयाच्या शुभमुहूर्तावर ‘रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडली. स्पर्धा लहान वयोगट, मोठा वयोगट, ग्रुप डान्स अशा तीन गटांमध्ये पार पडली. प्रत्येक गटातील स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
लहान वयोगट – २. आस्था परब, ३. लक्षिता कडुलकर, २. मोठा वयोगट – २. लावण्या अपराज, ३. आरोही घाडीगांवकर, ३. ग्रुप डान्स स्पर्धा: विजेत्या हर्षिता आणि शमिका. स्पर्धेचे परीक्षण परीक्षण लता पाटील, कुमूद पराडकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विजय कडूलकर, प्रशांत सावंत,संदीप राणे, श्री. र्शन पोयेकर, तेजस पोयेकर, धनंजय सावंत, शरद पोयेकर, शरद लाड, स्वप्निल सावंत, मिलिंद बुचडे, सुशांत सावंत, नरेंद्र कांबळी, प्रभाकर बुचडे, अक्षय पोयेकर, श्री. दीपक पोयेकर, रविराज कांबळी, शैलेश राणे, निशा कांबळी, दिव्या सावंत, तृप्ती बुचडे यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!