कणकवली (प्रतिनिधी) : अक्षरसिंधू साहित्य कलामंच कणकवली- सिंधुदुर्ग यांच्या वतीने महाराष्ट्र रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. नाटकाची तालीम चालू करून रंगभूमी दिन थाटामाटात साजरा करण्यात आला. नमन नटवरा या नांदी ने कार्यक्रमाची सुरुवात करत नटराज पूजन करून सुरवात करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र रंगभूमी परीनिरीक्षण मंडळ सदस्य तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष संजय राणे ,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे ,संस्थेचे कार्यवाह ऋषिकेश उर्फ दादा कोरडे ,संस्थेचे सचिव मयुर चव्हाण, तसेच यावर्षी संस्था महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी बसवीत असलेले श्री प्रल्हाद जाधव लिखित ‘सुजाता मेली न्हाय’ या नाटकाची तालीम ज्यांच्या दिग्दर्शनाखाली चालू आहे ते अभिषेक कोयंडे तथा सौ.आज्ञा कोयंडे (सोनल उतेकर) तथा नाटकातील कलाकार सुविधा कदम , पूजा राणे, प्रतिमा तांबे, नेहा कदम, दिव्या तांडेल, सुदीन तांबे, प्रमोद तांबे, विठ्ठल चव्हाण, आनंद जाधव, संतोष कदम, सोहन सावंत, साबाजी पराडकर आदी कलाकार उपस्थित होते.