आचरा (प्रतिनिधी): पर्यटन क्षेत्रातील प्रकल्प चालवत असलेल्या किंवा नवीन प्रकल्प उभारू इच्छित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४८ महिला उद्योजकांनी आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या कार्यशाळेचा लाभ घेतला दिवाळी सुट्टी चा विचार करून पर्यटन व्यावसायिक महासंघाने प्रत्येक महिला व्यावसायिकांना योजने विषयी माहिती देण्यासाठी चार दिवसाची कार्यशाळेचे आयोजन केले होते कार्यशाळेचा लाभ घेणाऱ्या महिलांनमध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या प्रमुखाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता महिला उद्योगांसाठी आई योजने अंतर्गत रुपये 15 लाख कर्जावरील व्याज परतावा पर्यटन संचालनालय महाराष्ट्र विभागाकडून देण्यात येणार आहे यासाठी महिला उद्योजकांकडून अर्ज विहित नमुन्याची माहिती देण्यात आली योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना आणि अर्जाचा नमुना पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे उपलब्ध करून देण्यात आला तसेच पर्यटन उद्योगात कार्यरत असलेल्या महिलांना सदर बाबतचा अर्ज कसा करावा यांच्ची माहिती साठी हॉटेल श्री महाराज येथे दिनांक 15/11/23 ते 18/11/23 पर्यंत रोज सकाळी 11 ते 2 पर्यंत देण्यात आली पर्यटन महासंघाच्या या विशेष उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला उद्योजक योजनेचा लाभ घेऊन आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी मदत होणारी आहे. पर्यटन हे येणाऱ्या काळात वेगाने वाढणारे क्षेत्र असून महिलांचा यामधील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासासाठी साधन ठरू शकते पर्यटन क्षेत्रात महिलांचे उद्योजकता व नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी असून राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने आई महिला केंद्रित पर्यटन धोरण 23 जाहीर केले आहे.त्यामाध्यमातून पर्यटन संचालनाकडे नोंदणीकृत करून मालकी हक्काच्या किंवा भाडेतत्वावर चालविलेल्या हॉटेल, होम स्टे, टूर एजंसी, पर्यटन प्रकल्पासाठी 15 लाख कर्जाच्या व्याजावरील रक्कम त्यांच्या आधार लिंक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा 7 वर्षे कालावधी पर्यंत जमा करण्यात येईल. यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने महिलासाठी धोरणा बद्दल राज्यसरकारचे अभिनंदन करीत असून या योजनेत कॅरव्हॅन, बीच शॅक, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल)पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, बी अँड बी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, हॉटेल, मोटेल, हाऊस बोट, टॅट, ट्री हाऊस, हॉटेल व्होकेशनल हाऊस, पर्यटन व्हिला, वूडन कॉटेज, रेस्तोरंट, उपहारगृह, फास्ट फूड, महिला चलित कॉमन किचन, कॅफे, टूर ऑपरेटर ट्रॅव्हल एजंट, टूर मार्गदर्शक, क्रूज, टूर ऍन्ड ट्रॅव्हलर एजन्सी, आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज, टूरिस्ट ट्रांसपोटर्स ऑपरेटर, आदिवासी, निसर्ग पर्यटनाशी संबांधित प्रकल्प, मेडिकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेदा, योगा केंद्र इतर पर्यटन व्यवसायांचा समाविष्ट असून या माध्यमातून जास्तीत जास्त महिला पर्यटन व्यवसायाकडे वळून आर्थिक सक्षम होतील असा विश्वास विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघाने व्यक्त केला आहे .सदर पर्यटन पूरक व्यवसाय पर्यटन संचालनाकडे नोंदणी करणे आवश्यक असून यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ महिला उद्योजकांना येणाऱ्या काळात आवश्यक ती मदत करणार आहे यावेळी कार्यशाळेत किशोर दाभोलकर, मंगेश जावकर, अवि सामंत, कमलेश चव्हाण,पूजा सरकारे यांनी उपस्थित महिला उद्योजकांना आई योजने संदर्भात मार्गदर्शन केले. अशी माहिती विष्णू(बाबा) मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली.