वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ व सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त उपक्रम
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ व सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने,बुधवार दि.22 रोजी सकाळी 11 वाजता,राजापुर अर्बन बँक शाखा वैभववाडी च्या वरच्या मजल्यावर,वैभववाडी तालुक्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजुपीक काढणी, हाताळणी,विक्री, शासकीय योजना,समस्या या संदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमास,अजय थुटे (DDM नाबार्ड सिंधुदुर्ग) , गजानन पाटील ( तालुका कृषी अधिकारी ), क्षितीजा गडगडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तरी वैभववाडी तालुक्यातील सर्व काजु उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प्रमोद रावराणे चेअरमन- वैभववाडी ता.ख.वि.सं व महेश गोखले चेअरमन-सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. वैभववाडी यांनी केले आहे.