चौके (अमोल गोसावी) : सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या स्मृती प्रित्यर्थ आभाळमाया ग्रुप आणि जी. एच. फिटनेस, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या निवासस्थानी, कावळेवाडी – वराड – कट्टा, ता. मालवण येथे घेण्यात येणार आहे. या शिबीरासाठी जी.एम.सी. गोवा बांबुळी हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय ओरोस, एस.एस.पी.एम. हॉस्पिटल पडवे. यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी आपल्या मित्रपरिवारासहित उपस्थित राहून रक्तदान करावे आणि सामाजिक कार्यास मोलाचा हातभार लावावा. असे आवाहन आभाळमाया ग्रूप आणि जी.एच.फिटनेस, कट्टा यांच्या वतीने करण्यात आले आहे.