शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांची उद्या बांबर्डेत खळा बैठक

पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ. वैभव नाईक यांचे आवाहन

  शिवसेना नेते, युवासेना प्रमुख  आ. आदित्य ठाकरे हे खळा  बैठकांच्या निमित्ताने उद्या गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी  सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. दुपारी १ :३० वा .  बांबर्डे येथे शिवसेना महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी यांच्या घरी ते खळा बैठक घेणार आहेत. तरी यावेळी सर्व शिवसेना, युवासेना,महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी- माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
error: Content is protected !!