खारेपाटण (प्रतिनिधी) : झुंझार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव – २०२६ मध्ये खारेपाटण जेधेवाडी येथील शिवतरुण विकास मंडळाच्या भजन मंडळीच्या वतीने बुवा विजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीच्या समोर मंगळावर दि.२० रोजी सुश्राव्य भजन व सामूहिक आरती करण्यात आली.
खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात देवी दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली असून येथे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम नवरात्रोत्सवात संपन्न झाले. शिव तरुण विकास मंडळ जेधेवाडी, खारेपाटण च्या भजन मंडळींनी भजन सादर करून देवीची मनोभावे सेवा केल्याबद्दल झुंझार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष संकेत शेट्ये यांच्या शुभहस्ते बुवा विजय सावंत आणि प्रकाश जेधे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या भजन मंडळात जेधे, गोठणकर, घाग, सावंत, गोसावी कुटुंबातील तरुणाचा समावेश होता.
या कार्यक्रमाला झुंझार मित्र मंडळाचे कार्यकर्ते महेश कोळसुलकर, दिगंबर राऊत, गणेश कारेकर, संतोष गाठे, संकेत लोकरे, राज गुरव, अंकुर गांधी, भूषण कोळसुलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












