नांदगाव पाटीलवाडी येथील घटना
कणकवली (प्रतिनिधी): रत्नागिरी हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारच्या चालकाचे नियंत्रण सुटून कार महामार्ग लगतच्या पीकअप शेडमध्ये घुसली.या अपघातात शाळेत जण्यासाठी बसची वाट बघत असलेल्या शाळकरी मुलीसह कारचा चालक जखमी झाला आहे. पिकअप शेडचेही मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी साडे नऊ वाजता घडला.घटनास्थळी कणकवली पोलिसांनी धाव घेतली असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे.















