आचरा (प्रतिनिधी): आई भगवती माऊली यात्रा व श्री दत्त जयंती उत्सव यांचे औचित्य साधत चिंदर उपसरपंच दिपक सुर्वै यांच्या संकल्पनेतून चिंदर गावातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यासपिठ मिळाव या प्रामाणिक उद्देशाने चिंदर ग्रामपंचायत व चिंदर सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक- प्रकाश मेस्री (अध्यक्ष-चिंदर सेवा संघ) पुरस्कृत 2555 व उपसरपंच दिपक सुर्वे पुरस्कृत चषक, व्दितिय पारितोषिक- श्री केदार परुळेकर( ग्रामपंचायत सदस्य चिंदर) पुरस्कृत- 2111 व उपसरपंच श्री दिपक सुर्वे पुरस्कृत चषक तृतीय पारितोषिक- संतोष कोदे (माजी सरपंच चिंदर) पुरस्कृत – 1111 व उपसरपंच दिपक सुर्वै पुरस्कृत चषक, उत्तेजनार्थ दोन पारितोषिक- श्री देवेंद्र हडकर (चेअरमन सोसायटी चिंदर) 555+555 उपसरपंच श्री दिपक सुर्वे पुरस्कृत चषक हि स्पर्धा चिंदर गावातीलच कलाकारांना खूली असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 23 डिसेंबर पर्यंत 1) विशाल गोलतकर- 09820585969, 2) मोरेश्वर गोसावी-07083226088, 3)सिध्देश गोलतकर- 07798748897 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.