कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे यांचा नवा पायंडा

निवड झालेल्या कलाकारांकडे जाऊन मंजुरी पत्राचे वाटप

वेंगुर्ले (प्रतिनिधी): राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संतोष कानडे यांनी समाजापुढे एक नवा पायंडा घालून कलाकारांच्या कलेचा गौरव केला. त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांना स्वत: येऊन मंजुर पत्र प्रदान केली, त्यामुळे कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समिती गठीत केल्यावर तातडीने समितीची बैठक आयोजित करून जिल्ह्यातील १०० कलाकारांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली . त्यामुळेच गेली ८ ते १० वर्षे प्रतिक्षेत असलेल्या गोर गरीब कलाकारांना न्याय मिळाला. त्यामुळेच कलाकारांनी धन्यवाद दिले. भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील गणपत सखाराम माधव, दिवाकर भिवा कुर्ले, राजन शामराव नवार, दत्तात्रय रामचंद्र शेणई, सुभाष राजाराम चेंदवनकर, इलीहास पेद्रु फर्नांडिस, विनायक न्हानु परब, जयराम श्रीपाद नाईक, लक्ष्मण अर्जुन नांदोसकर, सिताराम लवु मिसाळे इत्यादी कलाकारांना मंजुरी पत्र सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, ता. सरचिटणीस प्रशांत खानोलकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, शक्तिकेंद्र प्रमुख ताता मेस्त्री, बाबा राऊत, गजानन कुबल, दिपक परब, पांडुरंग मोंडकर, विजय तेरेखोलकर, सुहास नवार, प्रशांत नवार, रामचंद्र नर्से, चिन्मय माधव, अरविंद नवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!