भाजपा जिल्हाध्यक्ष तेली यांचा विश्वास
कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे रिंगणात आहेत. म्हात्रे यांचा विजय हा एकतर्फी होणार आहे.म्हात्रे यांच्या विजयासाठी भाजपा- बाळासाहेबांची शिवसेना आणि शिक्षक संघटनांच्या बैठकीत म्हात्रे यांच्या विजयासाठी रणनीती आखली आहे.संपूर्ण कोकणात जोरदार प्रचार सुरू आहे. शिक्षक संघटना तसेच संस्थाचालकांना नेहमीच सहकार्य भाजपाचे असते. त्यामुळे यावेळी म्हात्रे यांच्या विजयासाठी सर्वांनीच कंबर कसली असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गणेश राणे, भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, देवेंद्र सामंत, नेहा खोत उपस्थित होते. म्हात्रे यांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या हक्कांसाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. म्हात्रे हे स्वतः शिक्षक असून मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत.त्यामुळे शिक्षक आणि संस्थाचालकांच्या समस्यांची जाणीव त्यांना आहे. सर्व शाळेत मुलींसाठी स्वछतागृहे असावी ही आमची मागणी आहे. सर्व शाळांमध्ये आय टी सेक्शन सुरू करण्याची मागणी पालकमंत्रि चव्हाण यांच्याकडे केली आणि त्याला अनुसरून सिंधुदुर्गमधील 8 संस्थांमध्ये एमपीएससी, यूपीएससी अभ्यासासाठी अद्ययावत व्हर्च्युअल रूम तयार केली जाणार आहे.सिंधुदुर्गातील होतकरू हुशार विद्यार्थी स्पर्धा परिक्षांत यशस्वी व्हावे हा उद्देश ठेवून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती तेली यांनी दिली.